डोंगराच्या कुशीत वसलेल निसर्ग संपन्न गाव म्हणजे आसोली.आसोली गावात कोणतही
मोठ पर्यटन स्थळ नाही आहे. पण तरीही येथील निसर्ग, झाडा झुडुपातून जाणारे
छोटे छोटे रस्ते, पायवाटा सर्व काही मोहरुन टाकणार वाटत.
गावाची ग्रामदेवता नारायण. गावातील नारायण मंदीर फार प्रसिध्द आहे.मुळचे या
गावचे पण व्यवसायानिमीत्य परप्रांतात राहणारे आवर्जुन आपल्या कुलदेवतेच्या
भेटीला येतात. गावात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची चांगली सोय आहे.
शिक्षणाचा दर्जा उत्तम आहे. दहावीचा निकाल दरवर्षी उत्तम लागतो. |