Vengurla Panchkroshi             Make this page ur favorite

 

 
 

Home >                                                         

 

   | Sign Guestbook |View Guestbook |

 

 

माहितीपर संकेतस्थळे  (भारतीय ब्लॉग नोंदणी)

 

                                

माहितीपर संकेतस्थळे  (भारतीय ब्लॉग नोंदणी)

मित्रांनो गेले पाच महिने मी तुम्हाला या सदरात काही माहितीपर आणि मनोरंजक संकेतस्थळांची माहिती करुन देत आहे. मी आज तुम्हाला काही अशा संकेतस्थळांची माहिती देणार आहे की ज्यावर नोंदणी करुन आपण आपल्या ब्लॉगची वाचकसंख्या वाढवू शकता. आज पहिल्या भागात आपण फक्त भारतीय ब्लॉग नोंदणी करणाऱ्या संकेतस्थळांबद्दल जाणूण घेउ. यातील काही संकेतस्थळांबद्दल तुम्हाला माहिती असेलच. उदा. मराठी ब्लॉग्ज नेट आणि ब्लॉगवाणी. मी तुम्हाला खालील भारतीय संकेतस्थळे सुचवत आहे. सदस्य होण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात असू द्या तुमच्या ब्लॉग भारतीय असणे आवश्यक आहे.

भारतीय ब्लॉग नोंदणी संकेतस्थळे


1>  ब्लॉगवाण
ब्लॉगवाणी हे संकेतस्थळ मराठीब्लॉग्ज प्रमाणेच सर्व मराठी ब्लॉगर्सना एकत्र आणण्याचे काम करते. या संकेतस्थळावर तुम्ही असंख्य लेख वाचू शकता.

या संकेतस्थळाबद्दल मी यापूर्वीही माहिती दिली आहे. त्याची लिंक देत आहे. टिचकी मारुन पहा.

http://marathisamuday.blogspot.com/2008/02/2.html


2>  मराठीब्लॉग्ज.नेट
 
अत्यंत यशस्वी मराठी संकेतस्थळ म्हणून मराठीब्लॉग्ज.नेट ची ओळख आहे. २००५ साली या संकेतस्थळाची सुरुवात झाली आणि आज हे मराठीतील सर्वात लोकप्रिय संकेतस्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तेव्हा जरुर भेट द्या आणि मराठी ब्लॉग्जची मजा लुटा.

या संकेतस्थळाबद्दल मी यापूर्वीही माहिती दिली आहे. त्याची लिंक देत आहे. टिचकी मारुन पहा.

http://marathisamuday.blogspot.com/2008/02/blog-post_18.html


3> ब्लॉगस्ट्रीट इंडीया

ब्लॉगस्ट्रीट इंडीया हे संकेतस्थळ आपल्या ब्लॉगला वर्गवारीनुसार समाविष्ट करुन घेते. अधिकाअधिक वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी ह्या संकेतस्थळाचा उपयोग होइल.तुमच्या ब्लॉगच्या लोकप्रियतेनुसार तुम्ही अव्वल बनू शकता.


4> इंडिया ब्लॉग्ज १.०

 हे संकेतस्थळ आपल्या ब्लॉगला वर्गवारीनुसार समाविष्ट करुन घेते. पहिल्याच पानावर सजेस्ट अ ब्लॉगवर क्लिक करुन तुम्ही तुमचा ब्लॉग नोंदणी करु शकता.


5> देसी ब्लॉग्ज

देसी ब्लॉग्ज ह्या संकेतस्थळावर फार कमी मराठी ब्लॉग्ज आहेत. आपण आपला ब्लॉग या संकेतस्थळावर जरुर नोंदणीकृत करा. मराठी संख्या वाढली पाहिजे.


6> कामत ब्लॉग पोर्टल

कामत ब्लॉग पोर्टल हे संकेतस्थळ नावावरुन तरी मराठी वाटते. या संकेतस्थळावर तुम्ही आत्ता अपडेट केलेला तुमचा ब्लॉग पाहू शकता. इंडीयन ब्लॉग नोंदणी मध्ये हे संकेतस्थळ अव्वल आहे. त्यामुळे तुम्ही मोठी वाचकसंख्या मिळवू शकता.


क्रमशः

(कोणतीही शंका असल्यास जरुर कमेंट करा. शक्यतो नोंदणीसाठी वेगळा ई-मेल पत्ता तयार ठेवा.)

 

-वामन परुळेकर

 

 

[ Top | Home | About us ]

©VP

Vengurla! Panchkroshi

@2005-07

This site is hosted by

 
      © WAMAN PARULEKAR