मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते, प्रसिद्ध नाट्यनिर्माते, मालवणी भाषा
सातासमुद्रापार पोचविणारे मच्छिंद्र कांबळी वय ५८ यांचे दि. ३०/०९/२००७ रोजी
सायंकाळी साडेसहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांना ही श्रध्दांजली.
मालवणी भाषेवर नितांत प्रेम असलेला कलाकार म्हणजे बाबूजी. तात्यांना मालवणी
मुलुखाचा आणि मालवणी भाषेचा विलक्षण अभिमान. प्रादेषिक भाषेतील नाटयप्रकाराला
मुख्य रंगभूमीवर आणून कांबळी यांनी मालवणी भाषेच्या लोकप्रियतेचा ईतिहास घडवला.
मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरण या पहिल्याच नाटकाद्वारे व्यावसायिक मराठी
रंगभूमीवर इतिहास घडवला. अस्सल मालवणी बोलीतले लोकनाट्याच्या धर्तीचे हे नाटक
मैलाचा दगड ठरले. कांबळी यांचा अभिनयाचा ठसा खऱ्या अर्थाने उमटला तो, "वस्त्रहरण'मधील
तात्या सरपंच या भूमिकेने. "वस्त्रहरण' या नाटकाचे ४८९९ प्रयोग झाले.
त्यानंतर पांडगो इलो रे , घास रे रामा , वय वर्ष पंचावन्न , भैय्या हातपाय पसरी
, येवा कोकण आपलाच असा , माझा पती छत्रीपती अशी अनेक नाटके त्यांनी आपल्या
भद्रकाली प्रोडक्शन या नाटयसंस्थेमार्फत अनेक वर्ष चालवली.
कांबळी यांना वस्त्रहरण लंडनला न्यायच होत. पण पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी
त्यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर, नाना पाटेकर, अशोक सराफ, सचिन अशा बडया कलाकारांना
घेउन षण्मुखानंदमध्ये वस्त्रहरणचा विषेश प्रयोग केला. त्या प्रयोगाला ९३ हजार
बुकिंक झाल होत. त्यानंतर वस्त्रहरणचा लंडनला प्रयोग झाला.
कांबळी यांची काही गाजलेली नाटके
वस्त्रहरण |
सावळो गोंधळ |
पांडगो इलो रे इलो |
तुमच ते आमच |
चालगती |
केला तुका झाला माका |
चाकरमानी |
घास रे रामा |
येवा कोकण आपलोच आसा |
राम तुझी सिता माउली |
वाजले किती? |
भैया हातपाय पसरी |